बुलडाण्यात 17 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 वर

आज प्राप्त झालेल्या 33 अहवालापैकी 32 अहवाल निगेटिव्ह आले असून एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बुलडाणा | जिल्ह्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी आज 33 जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 32 अहवाल निगेटीव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा टुनकी, ता. संग्रामपूर येथील 17 वर्षीय तरुण आहे. सदरील तरुण हा मुंबई येथून आला असल्याचा प्रवास इतिहास आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 37 इतकी झाली आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 26 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नरवेल ता. मलकापूर येथील पाच वर्षीय चिमुकलीला आज सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात 8 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत एकूण 906 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies