कर्नाटकातील येडीयुराप्पा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

बेंगळुरु | कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. हे मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी येथी मोठे राजकीय नाट्य रंगले होते. कुमारस्वामींचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर हे सरकार अल्पमतात आले. यानंतर हे सरकार कोसळले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. यानंतर येडीयुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. जवळपास महिनाभरानंतर येथील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत मिळाले नव्हते. यामुळे येडीयुराप्पा यांना स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर काँग्रेस, जेडीएसने आघाडी केली. कुमारस्वामींना पाठिंबा देण्यात आला होता. कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालवले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्रास दिला जात होता. यामुळे गेल्याच महिन्यात काँग्रेसचे 12 आणि जेडीएसचे 3 आमदारांनी बंड करून राजीनामे दिले होते. यानंतर कर्नाटकात मोठे राजकीय नाट्य रंगले होते. आमदारांनी बंडखोरी केली आणि थेट मुंबई गाठली. यामुळे त्यांना मनविण्यासाठी काँग्रेसचे नेतेही मुंबईत आले होते. मात्र, ते यात अयशस्वी झाले. यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामींनी चालढकल करत विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला होता. यावेळही वेळकाढू धोरण अवलंबत एक आठवडा टोलवाटोलवी केली होती. अखेर बहुमत सिद्ध होत नसल्याचे पाहून कुमारस्वामींनी राजीनामा दिला होता. यानंतर येडीयुरप्पा यांनी आपले सरकार स्थापन केले.AM News Developed by Kalavati Technologies