सातारा जिल्हात कोरोनाचे 163 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 163 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सातारा | जिल्ह्यात आज 163 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार 430 इतकी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 136 जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 2 हजार 128 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 2 हजार 146 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies