नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नांदेड | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतांना बघायला मिळत आहे. जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात तब्बल 162 रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. आजघडीला जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3518 वर पोहचली आहे. आज 130 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 126 एवढी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या 1516 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 1322 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 162 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 3518 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 1909 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 1465 आहेत. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची चिंता वाढतच आहे.AM News Developed by Kalavati Technologies