नागपूरात आज 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, कोरोनाग्रस्तांची संख्या 446 वर

आतापर्यंत ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नागपूर | आज १२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एका मृत महिलेच समावेश आहे. याशिवाय पुण्यातुन आई वडिलांची तब्येत बघण्यासाठी कामठी येथे आलेल्या एका दांम्पत्य आणि त्यांचा मुलगा सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. आज नवीन १२ रुग्ण पुढे आल्याने नागपुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचा वेग मंदावला असताना आज एकच वेळी १२ कोरोना बाधित रुग्ण पुढे आल्याने कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचे स्पष्ठ झाले आहे. आज एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे,त्यामुळे नागपुरातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ९ वर गेला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. ती महिला कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागात राहणारी आहे. सदरील महिलेची तब्येत खराब झाल्यानंतर तिला मेडिकल येथे दाखल करण्यासाठी नेले असता तिचा आधीच मृत्यू झालेला होता. त्यानंतर त्या महिलाचे स्वॅब घेण्यात आले होते. दरम्यान मृत्यूनंतर या महिलेचा तपासणी अहवाह पॉझिटिव्ह आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies