वाळूज सिडको महानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकानाचे शटर उचकटून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

वाळूज परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद | वाळूज एमआयडीसी सिडको वाळूज महानगर परिसरातील  गट नंबर 140 मधील श्री साई प्रोव्हिजन व सुमित साडी सेंटर या दोन दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटुन अंदाजे 3 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार दुकान मालक विठ्ठल कल्याणे हे नेहमी प्रमाणे संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करून घरी गेले असता, सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही लोकांना दुकानाचे शटर उचकटल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तातडीने ही माहिती दुकान मालक विठ्ठल कल्याणे यांना दिली.

त्यानंतर कल्याणे यांनी दुकानात येऊन बघितले असता. दुकानात ठेवलेले रोख 1 लाख 20 हजार व अंदाजे दीड लाखांचा किराणा माल असा एकूण 2 लाख 70 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निर्देशनात आले. तसेच बाजूला असलेल्या सुमित साडी सेंटर मधील अंदाजे 17 हजार रोख व 70 ते 80 हजाराच्या साड्या व लेडीज वेअर असे एकूण 90 हजारापेक्षा जास्त मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे व नवाब शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies