विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा - मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, 9 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याचा आरोप

मुंबई । राज्यात बार्टीच्या धर्तीवर सुरु केलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्यासाठी सारथी या संस्थेची स्थापना झाली. मात्र सारथी संस्थेला सद्यपरिस्थितीत कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गेल्या 9 महिन्यांपासून कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. सद्यस्थितीत मराठा समाजाची दिशाभूल चालूच आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार हे या सारथीचे कारभार करण्यास सक्षम मंत्री नाहीत. त्यामूळे त्यांच्याकडून राज्य सरकारनं पदभार काढून घ्यावा अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. सारथीची स्वायत्तता कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी 7 जू्लैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारने आरणक्षप्रश्नी जमेची बाजू मांडावी आणि जर का आरक्षणप्रश्नी दगाफटक झाला तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies