...म्हणून मला राजकारणातून संपवण्याचा भाजपचा प्रयत्न - धनंजय मुंडे

माझ्यात ही शक्ती तुमच्या आशीर्वादाने आलेली असल्यानेच लढायची हिम्मत कायम -धनंजय मुंडे

परळी । मी मतदारसंघातील जनसामान्यांसाठी 24 तास काम करतो आहे, म्हणुनच मला राजकारणातून संपवण्यासाठी गल्लीतल्या नेत्यांपासून दिल्लीतल्या मोदी, शाह यांना परळीत आणण्यापर्यंत प्रयत्न होत आहेत. मात्र, परळी मतदारसंघातील स्वाभिमानी जनता, त्यांच्यासाठी झिजणार्‍या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याच पाठीशी असल्याचा आत्मविश्वास, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात पट्टीवडगावमधून झालेली असल्यानेच, मी आजपर्यंतची वाटचाल करू शकलो आहे. भविष्यातील मोठ्या जवाबदारीसाठीही याच जनतेचे आशीर्वाद आवश्यक आहेत. माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना, मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत आहे. 3 वेळा स्व.मुंडे साहेबांवर हल्ला करणार्‍या, मुंडे साहेबांनी भस्मसात केलेल्या आष्टीच्या माणसांकडून, माझ्यावर खालच्या पातळीचे शाब्दीक वार केले जात आहेत. परळीची जनता सोबत असल्याचे लक्षात आल्यानेच, मोदी आणि शहांना बोलवावे लागत आहे. माझ्यात ही शक्ती तुमच्या आशीर्वादाने आलेली असल्यानेच लढायची हिम्मत कायम आहे, हे प्रेम मतातून व्यक्त करा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.AM News Developed by Kalavati Technologies