पालघरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 500 च्या पार, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनामुळे आजवर २० जणांचा मृत्यू झाला आहे.

पालघर | जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने पाचशेचा टप्पा पार केला असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५५७ वर पोहचली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून एकट्या वसई - विरार महापालिका क्षेत्रात ४९२ रुग्ण आढळून आले आहेत. तर पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली असून मोखाडा आणि तलासरी हे दोन तालुके वगळता उर्वरीत सर्वच तालुक्यांत कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनसमोरचे आव्हान वाढले आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आजवर २० जणांचा मृत्यू झाला आहे.

*तालुका निहाय आकडेवारी*

१) पालघर - २६
२) डहाणू- १५
३) वाडा - ०५
४) जव्हार - ०१
५) वसई ग्रामीण- १८
6) वसई- विरार मनपा - ४९२AM News Developed by Kalavati Technologies