खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात भीषण स्फोट

2 कामगारांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी


खोपोली । खोपोली शहरातील इंडिया स्टील या कारखान्यात मध्यरात्री भीषण स्फोट झाला असून या स्फोटात 2 कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.खोपोली शहरातील स्टील उत्पादन करणारा हा कारखाना असून येथे रात्रपाळी करत असलेल्या दोन कामगार हे एल पी सिलेंडर कटिंग करीत असताना हा स्फोट झाला.

यात खोपोली येथील कामगार दिनेश चव्हाण (वय 55) राहणार लक्ष्मीनगर खोपोली तर प्रमोद शर्मा वय (30) राहणार सुभाष नगर खोपोली यांचा मृत्यू झाला आहे. तर सुभाष वांजळे वय (55) राहणार वरची खोपोली हे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप समजले नसून कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा मुळे हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies