Corona Updates; महाराष्ट्रात आज 2940 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 99 जणांचा मृत्यू

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे.

मुंबई | महाराष्ट्रात आज दिवसभरात 2 हजार 940 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच कालावधीत 99 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. आज 1 हजार 084 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 28 हजार 081 वर गेला आहे. ही समाधानकारक बाब आहे. सध्या राज्यात 34 हजार 881 रुग्णांवर ठिकठिकाणी उपचार सुरू आहे. राज्यातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा जो कालावधी सुरूवातीला 11.3 दिवसांवर होता तो कालावधी आता 17.5 दिवसांवर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. राज्यात कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (रिकवरी रेट) 43.7 टक्के असून मृत्यूदर 3.37 टक्क्यांवर आहे. दरम्यान आज मृत्यूमुखी पडलेल्या 99 रुग्णांमधील मुंबईतील 54 रुग्ण, वसई विरार 7, पनवेल 7, ठाणे 6, पुणे 6, सोलापूर 6, रायगड 3, जळगाव 3, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 2, आणि एक रुग्ण नागपूरमधील आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये असून 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65 हजार 168 जण पॉझिटिव्ह आले आहे. सध्या राज्यात 43 शासकीय आणि 34 खासगी अशा 77 प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रतिदशलक्ष 3349 एवढे आहे. तर देशपातळीवरचे प्रमाण 2523 एवढे आहे.AM News Developed by Kalavati Technologies