जळगाव जिल्ह्यात आज 292 जणांना कोरोनाची लागण, रुग्णांची एकूण संख्या 5302 वर

जळगावात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे.

जळगाव | जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 292 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 302 झाली आहे. तर यामध्ये आतापर्यंत 309 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगांव शहर 82, जळगांव ग्रामीण 20, भुसावळ 18, अमळनेर 12, पाचोरा 1, भडगांव 1, धरणगांव 4, यावल 14, एरंडोल 17, जामनेर 33, रावेर 8, पारोळा 14, चाळीसगांव 17, मुक्ताईनगर 31, बोदवड 19 आणि दुसऱ्या जिल्ह्यातील 1, असे एकूण 292 रुग्णांचा समावेश आहेत.AM News Developed by Kalavati Technologies