‘मला द्यायचीये निर्भयाच्या दोषींना फाशी’, आंतरराष्ट्रीय नेमबाजनी रक्ताने लिहिलं अमित शाहांना पत्र

16 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सहा नराधमांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

नवी दिल्ली | 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देश हादरला. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची मागणी केली जात आहे. आता आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने लिहिलेलं पत्र लिहिलं आहे. निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाहा यांना वर्तिका सिंहने पत्र लिहिले. निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी तिने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिले आहे. ती म्हणाले की,'निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी देण्यात यावी. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेशा संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझं समर्थन करावं, यामुळे समाजात बदल अडू शकतो अशी अपेक्षा आहे', अशा आशयाचे पत्र वर्तिकाने लिहिले आहे.

16 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सहा नराधमांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. या पाशवी अत्याचारानंतर अकरा दिवस तिची मृत्युशी झुंज सुरू होती. मात्र 29 डिसेंबर रोजी तिची आयुष्याशी सुरू असलेली लढाई संपली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षाची सुनावण्यात आली आहे. तर एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होऊ शकतो.AM News Developed by Kalavati Technologies