'महाशिवआघाडी'साठी आजचा दिवस महत्त्वाचा, बैठकांचे सत्र सुरू

शिवसेनेचे सर्वच आमदार अजूनही मुंबईतल्या मढ येथील हॉटेल रिट्रीटमध्येच आहेत.

मुंबई | मंगळवारी संध्याकाळीपासून राज्यभरात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेह राष्ट्रवादीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी अधिक वेळ मागितला होता. मात्र त्याला नकार देण्यात आला. ठरलेल्या वेळेत दोन्हीही पक्ष सत्ता स्थापन करु शकले नाही. आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार मानला जात आहे. सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा होण्याची अपेक्षा आहेत. शिवसेनेचे सर्वच आमदार अजूनही मुंबईतल्या मढ येथील हॉटेल रिट्रीटमध्येच आहेत.

दरम्यान हे सर्व आमदार आपल्या मतदारसंघात परतणार असा अंदाज वर्तवला जात आहे. तर राष्ट्रवादीची सकाळी 10 वाजता यशवतंराव चव्हाण केंद्रात बैठक होत आहे. यासोबतच काँग्रेसच्या घडामोडींकडेही लक्ष असणार आहे. मंगळवारी राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्यासाठी रात्री साठेआठ पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी मुदत वाढवून द्या असे पत्र राज्यपालांना दिलं. यानंतर लगेच राज्यपालांनी महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे दिली. त्याच वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. यानंतर मंगळवारी संध्याकाळीपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापनेसाठी कोणते प्रयत्न करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies