IND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल Live : उपांत्य फेरीत भारत पराभूत, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव

न्यूझीलंडने मंगळवारी 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 211 धावा काढल्या

स्पोर्ट्स डेस्क । मँचेस्टरमध्ये भारत-न्यूझीलंडदरम्यान काल अर्ध्यावर थांबलेला सेमीफायनलचा सामना आज पुढे खेळवला जात आहे. न्यूझीलंडने मंगळवारी 50 षटकांत 8 विकेट गमावून 239 धावा काढल्या. भारताला 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांचा फायनल प्रवेशासाठी संघर्ष सुरू आहे.  उपांत्य फेरीत भारत पराभूत झाला आहे, न्यूझीलंडकडून भारताचा 18 धावांनी पराभव.

अशा गेल्या भारताच्या विकेट

- भारतीय संघाचा 18 धावांनी पराभव, न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल 

- जडेजा 77 धावांवर झाला बाद; भारताला विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज 

- भारताला सहावा धक्का, हार्दिक पंड्या माघारी; भारताच्या 6 बाद 92 धावा. 

- भारतीय संघाची पाचवी विकेट, मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद 

- भारतीय संघाला चौथा धक्का; दिनेश कार्तिक 6 धावांवर माघारी, निशमने पॉईंटमध्ये टिपला अप्रतिम झेल

- भारतीय संघाला तिसरा धक्का, सलामीवीर लोकेश राहुल देखील स्वस्तात बाद 

- भारतीय संघाला दुसरा धक्का, कर्णधार कोहली(1) बाद

- दुसऱ्याच षटकात भारतीय संघाला धक्का, रोहित शर्मा स्वस्तात बाद 

अशी झाली किवींची पडझड

- मॅट हेन्रीच्या रूपाने किवींची 8वी विकेट गेली. भुवीच्या चेंडूवर तो विराटने त्याचा झेल टिपला.
- 48व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने सातवी विकेट घेतली. लॅथमचा झेल जडेजाने पकडला. त्याने 11 चेंडूंत 10 धावा काढल्या होत्या.
- दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाल्यावर बुमराहने सहावा बळी घेतला. बुमराहच्या चेंडूवर रॉस टेलर जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. रॉस टेलरने 90 चेंडूंत 74 धावा काढल्या.
- भुवनेश्वर कुमारने भारताला मिळवून दिलं पाचवं यश, ग्रँडहोम(16) बाद; धोनीने टिपला झेल
- भारताला चौथं यश; पंड्याने धाडले निशमला माघारी
- भारताला मोठं यश, चहलने कर्णधार केन विल्यमसनला 67 धावांवर धाडलं माघारी
- भारतीय संघाला दुसरं यश, रवींद्र जडेजाने सलामीवीर हेन्री निकोल्सला केलं त्रिफळाचीत.
- मार्टिन गुप्तिलच्या रूपाने किवींना पहिला झटका बसला. बुमराहच्या चेंडूवर विराटने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

दरम्यान, दानावरील आकाशात ढगांनी गर्दी केलेली आहे. थांबून-थांबून पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंडची टीम सलग दुसरा वर्ल्डकप फायनल खेळण्यासाठी आतुर आहे. गत वेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध किताबी सामन्यात किवींचा पराभव झाला होता.

न्यूझीलंडचा पराभव करणे भारतासाठी सोपे नाही. टीम इंडियाने मागच्या 4 वर्षांत त्यांच्याविरुद्ध 5 एकदिवसीय सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघादरम्यान 2015 विश्वचषकानंतर 13 सामने झाले. यापैकी टीम इंडियाने 9 मध्ये विजय मिळवला. तर किवींना फक्त 4 सामन्यांतच यश मिळाले. मँचेस्टरमध्ये दोन्ही संघ 44 वर्षांनंतर आमनेसामने येतील. 1975च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने भारताला 4 गडी राखून पराभूत केले होते. यानंतर इंग्लंडच्या मैदानावर दोन्ही संघांदरम्यान आणखी दोन वन डे सामने झाले. दोन्ही सामन्यांत न्यूझीलंडचा संघ यशस्वी राहिला. 1999 मध्ये नॉटिंघममध्ये भारत 5 विकेट आणि 1979 मध्ये 8 विकेट्सनी पराभूत झाला होता.

असा आहे भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, कुलदीप यादव.

असा आहे किवींचा संघ
केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्तिल, मॅट हेन्री, टॉम लाथम, कॉलिन मुन्रो, जेम्स निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, ईश सोढी, टिम साउदी.AM News Developed by Kalavati Technologies