गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन सुरू, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा पोहोचले

गेटवे ऑफ इंडियावर अजूनही आंदोलन सुरू आहे

मुंबई | दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री हिंसक वळण लागले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकारानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. मुंबई पुण्यामध्ये यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. रात्रीपासून आंदोलने केली जात आहे. गेटवे ऑफ इंडियावर अजूनही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील पोहोचले आहेत.

यासोबतच जेएनयु घटनेचा निषेध करण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिनेते सुशांत सिंग पोहोचले. एनआरसी आणि सीएएच्या विरोधातसुद्धा सुशांत सिंग रस्त्यावर उतरले होते. आंदोलनात विद्यार्थ्याकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. डाव्या संघटनेने अभाविपवर या हल्ल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला. यानंतर देशभरातून घटनेचा निषेध केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies