...यावरुन नितेश राणे-निलेश राणे यांच्यात मतभेद

नव्या वादाला तोंड फुटलं

सिंधुदुर्ग । शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंना कणकवलीमधून उमेदवारी दिली. युतीचे उमेदवार असल्याने नितेश राणेंनीही मवाळ भूमिका घेत शिवसेनेवर टीका करणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र यावरुन नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.

नितेश राणेंची शिवसेना आणि ठाकरेंसोबत निवडणुकीत काम करणार असल्याची भूमिका निलेश राणे यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या विधानाला विरोध केला. "नितेशच्या या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरुनच करणार", असं ट्वीट निलेश राणेंनी केलं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

कणकवलीमधून नितेश राणे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. तर याच मतदारसंघातून शिवसेनेनेही त्यांचा अधिकृत उमेदवार दिला आहे. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेही शिवसेना उमेदवारासाठी घेणार आहेत. या सभेमध्ये आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies