महाराष्ट्राला पक्के माहीत आहे, 'शत्रू कोण अन् मित्र कोण', फडणवीसांचा पलटवार

एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असतांना दुसरीकडं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.

मुंबई | एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट असतांना दुसरीकडं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकावर शब्दांचा भडीमार करत आहे. आज महाविकासआघाडीच्या तीन मंत्र्यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पत्रकारपरिषद घेतली. यामध्ये जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करत त्यांचे सर्व दावे खोडून काढले. या पत्रपरिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच त्याला उत्तर दिले. महाविकासआघाडीच्या तिनही नेत्यांना उत्तर देतांना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण असल्याचं म्हंटल आहे. तसेच 'माझ्या एका पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने मंत्र्यांना तास न् तास बैठकी घ्याव्या लागल्या. एवढ्या बैठकी कोरोनाविरोधातील लढाईसाठी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचे चित्र आज असे नसते, असे सांगतानाच सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरे असते, फेकाफेकीसाठी तीन लोक लागतात,' असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुंबईत कोरोना रुग्णांच्या चाचण्या होत नाही सरकार फेकाफेकी करत आहे. खोटे आकडेवारी देत आहे. यावरून महाराष्ट्राचे भले होणार नाही. महाराष्ट्राला पक्की माहिती आहे, त्यांचा शत्रू कोण आणि मित्र कोण, या परिस्थितीतही आम्ही सरकारच्या पाठिशी खंबीर उभे आहोत आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण, सरकारकडून अशी फेकाफेक केली जात असेल तर आम्हाला त्यांचा पर्दाफाश करावाच लागणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies