20 कोटी महिलांच्या खात्यात जमा होणार दरमहा 500 रुपये, पंतप्रधान मोदींची घोषणा

मोदींची घोषणा : प्रत्येक महिन्यात मिळणार महिलांना 500 रुपयांचे अनुदान, यासोबतच प्रत्येक महिन्यात ग्रॅस सिलेंडर मिळणार, अतिरिक्त राशन सुद्धा मिळणार

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबांसाठी मोदी सरकारने आपली तिजोरी उघडली आहे. देशातील 20 कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसे दिले जातील. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी दुपारी एक लाख 70 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, ज्यामार्फत सर्वसामान्यांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत दिली जाईल. पुढील तीन महिन्यांकरिता देशातील सुमारे 20 कोटी महिलांच्या खात्यात सरकार दरमहा 500 रुपयांची मदत देणार आहेत.

 दरमहा मिळणार 500 रूपये

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की पंतप्रधान जनधन खात्यांतर्गत बँक खाते असलेल्या सुमारे 20.5 कोटी महिलांना पुढील तीन महिन्यांकरिता दरमहा 500 रुपयांची मदत दिली जाईल. ही रक्कम प्रत्येक महिन्यात या महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

गॅस

याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील 8.5 कोटी बीपीएल कुटुंबांना येत्या तीन महिन्यांत मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत साडेआठ कोटी महिलांच्या नावे गॅस जोडणी उघडण्यात आली होती. आता त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यात येतील असं मोदी सरकारकडून सांगण्यात आलं आहेत.

राशन

कोरोना विषाणूवर केलेल्या घोषणेमध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी अन्नधान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांत 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ उपलब्ध होईल. 80 कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त 1 किलो मसूरची तरतूद करण्यात आली आहे, हे सर्व धान्य नागरिकांना मोफत मिळणार आहेत. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे की या लॉकडाऊनच्या काळात सरकार गरिबांना 1.70 लाख कोटींची मदत करणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की पीएम गरीब कल्याण योजनेंतर्गत महिला बचत गटांतर्गत दीन दयाळ राष्ट्रीय ग्रामीण आजीविका योजनेंतर्गत 7 कोटी कुटुंबांना लाभ देण्यात येणार असून त्यांची दुप्पट रक्कम 20 लाखांपर्यंत जाईल.AM News Developed by Kalavati Technologies