धक्कादायक ! वडिलांना मुखाग्नि देण्यास मुलाचा नकार, शेवटी तहसिलदारांनी केला अंत्यविधी

ज्या वेळेस या रुग्णाचे अंत्यविधी चालू होते त्या वेळेस मात्र  घरातील सदस्य आणि त्यांचा मुलगा दूर उभे राहून बघत होते.

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये मानवी स्वभावाशी संबंधित सर्व प्रकारच्या बाबी समोर येत आहेत. या युद्धात गरजूंच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. त्याचबरोबर अशा काही घटनाही समोर येत आहेत जे मानवतावादाच्या विरुद्ध आहेत. चेन्नईमध्ये, कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार येथे करू नका असं म्हणून नागरिकांनी त्यांचा रस्ता रोखला तर दुसरीकडे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सदरील रुग्णाचा मुलगा आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. लहानपणापासून सांभाळलेल्या मुलाने आणि परिवाराने वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने डॉक्टरही हैरान झाले.

भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शुजालपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला अर्धांगवायू झाला आणि त्यामुळे या व्यक्तीला भोपाळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 14 एप्रिलला या व्यक्तीचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आणि याच दिवशी त्याला विवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना या व्यक्तीचा मृत्यू झाला दरम्यान या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. आम्हालाही कोरोनाची लागण होईल असं सांगून नातेवाईक आणि मुलाने आता तुम्हीच त्यांचा अंत्यविधी करून घ्या असं डॉक्टरांना सांगितले अखेर तहसीलदार गुलाबसिंग बघेल स्वेच्छेने शेवटच्या संस्कारांसाठी पुढे आले. त्यांनी सदरील रुग्णाला मुखाग्नि दिला.

ज्या वेळेस या रुग्णाचे अंत्यविधी चालू होते त्या वेळेस मात्र  घरातील सदस्य आणि त्यांचा मुलगा दूर उभे राहून बघत होते. भोपाळचे जिल्हा अधिकाऱ्यांनी गुलाबसिंग बघेल यांचे कौतुक करताना असं म्हंटल आहे की प्राणघातक विषाणूविरूद्ध युद्धात मोठ्या अडचणीचा सामना करुनही कोरोना वॉरियर्स मानवतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत अशा कोरोना योद्ध्यांना सलाम.AM News Developed by Kalavati Technologies