...पण आमचा गनिमी कावा फसला, फडणवीसांची कबूली

तो आमचा गनिमी कावा फसला, पण हे करणं त्यावेळी महत्त्वाचं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे

मुंबई । राज्याच्या राजकारणात 23 नोव्हेंबर रोजी मोठा राजकीय भुकंप घडला होता. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं वाटत असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार औटघटकेचे ठरले आणि शपथविधीनंतर अवघ्या काही तासांत हे सरकार कोसळले. यानंतर आपण अजित पवार यांच्यावर विश्वास कसा काय ठेवला असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना वारंवार विचारला जात आहे. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आम्ही गनिमी कावा करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला अशी कबूली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ते म्हणाले, आमच्या शपथविधीच्या दोन-तीन दिवसांपासूनच अजितदादांशी चर्चा सुरू झाली होती. काही गोष्टी पवारसाहेबांच्या स्तरावर होत होत्या. शपथविधी घेण्याच्या एक-दोन दिवस आधी अजितदादा आमच्याकडे आले होते. तीन पक्ष एकत्र सरकार चालवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. त्यावेळी या तिन्ही पक्षांनी मिळून आम्हाला साइडलाइन केलं होतं. ज्या पक्षाला सर्वात मोठा जनादेश मिळालेला आहे, तो पक्ष पूर्णपणे बाजूला काढण्यात आला होता. अशा परिस्थितीत राजकारणामध्ये गनिमी कावासुद्धा खेळावा लागतो. तो आमचा गनिमी कावा फसला, पण हे करणं त्यावेळी महत्त्वाचं होतं, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies