#Budget2020 | मध्यमवर्गीयांना सरकारचा मोठा दिलासा, 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स घटवला

खुशखबर । प्राप्तिकरामध्ये सरकारने काही प्रमाणात सवलत दिली असून टॅक्स कमी केला आहे.

बजेट डेस्क ।  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होत आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. प्राप्तिकरामध्ये सरकारने काही प्रमाणात सवलत दिली असून टॅक्स कमी केला आहे.

टॅक्स स्लॅब - वार्षिक उत्पन्न

करमुक्त - 2.5 - 5 लाख

10% - 5 ते 7.5 लाख

15% - 7.5 ते 10 लाख

20% - 10 ते 12.5 लाख

25% - 12.5 ते 15 लाख

30% - 15 लाखांपेक्षा जास्त

- 5 लाख ते 7.5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर पूर्वी 20 टक्के होता

- 7.5 लाख ते 10 लाख दरम्यानच्या उत्पन्नावर 15 टक्के आयकर

- 10 लाख ते 12.5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर, पूर्वी 30 टक्के

- नवीन बांधकाम कंपन्यांना 15 टक्के कॉर्पोरेट कर भरावा लागेल

- 2020-21 आर्थिक वर्षासाठी सरकारने अंदाजित जीडीपी दर 10 टक्के निश्चित केला आहे

- सरकारने एलआयसीमधील आपल्या भागभांडवलाचा काही भाग आयपीओमार्फत विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भागभांडवलाची आयडीबीआयमध्येही विक्री केली जाईल.

- यावर्षी वित्तीय तूट जीडीपीच्या 3.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षासाठी 3.5.. टक्के उद्दिष्ट.

- सरकार सर्व बँकांवर पूर्ण देखरेखीची व्यवस्था करेल. बँकिंग प्रणाली सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.AM News Developed by Kalavati Technologies