कोविड व्यतिरिक्त कॅन्सर आणि किडनीसारख्या अन्य रुग्णांचा प्रश्न ऐरणीवर..

उपचाराअभावी आत्महत्या करू का? रुग्णांचा संतप्त सवाल, शासनाकडून मिळणारे पैसे कमविण्यासाठी अनेक रुग्णालय कोविडमध्ये रूपांतर करत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

कल्याण । कल्याण पश्चिम भागातील टिळक चौकानजीक असलेल्या वैद्यकीय रुग्णालयात हे दाट लोकवस्तीत असल्याने कोविड केंद्र सुरु करु नये. तसेच रुग्णालयात कॅन्सर सारख्या अन्य आजारांवर उपचार घेत असेलल्या रुग्णांनाही कोविड केंद्र सुरु करण्यास विरोध केला आहे. या प्रकरणी काही जणांनी आज महापालिकेच्या आरोग्य विभागास भेट देऊन एक निवेदन सादर केले आहे. परंतु सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी आणि कोविड रुग्णाकडून लाखोंच्या घरात पैसे कमविण्यासाठी अनेक रुग्णालय स्वतः कोविड रुग्णालयात रूपांतरीत झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.


कल्याण पश्चिमेतील वैद्य रुग्णालय हे मेमोरियल चॅरिटेबल असून या ठिकाणी डायलिसीस व कॅन्सर रुग्णावर केमोथेरपी सारखे कमी पैशात उपचार केले जात आहेत. त्यातच हे रुग्णालय कोव्हीड रुग्णालय केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांनी या रुग्णालयाची कोव्हीड मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की काही दिवसांपूर्वी रुग्णालयाकडून जे वेस्टज सार्वजनिक कचरा कुंडीत टाकण्यात आला होता त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे स्थानकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याची कोविड मान्यता रद्द करण्यात यावी.

काही स्थानिकांनी याला विरोध करत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता आयुक्त आणि पालिका प्रशासनाने जबरदस्ती कोविड सेंटर उभारण्यास सांगितल्याचे सांगितले. परंतु हे रुग्णालय अन्य आजारासाठी बंद केल्याने डायलिसिस अभावी 5 जणांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांच्यासाठी डायलिसिस आणि केमोथेरपी चा प्रश्न उपस्थित झाला आहे. कल्याण मध्ये एकमेव मेमोरियल चॅरिटेबल असल्याने त्याठिकाणी ह्या सुविधा स्वस्त दरात केला जातो. या रुग्णालयात 200 डायलिसिस तर 50 हुन अधिक केमोथेरपी केल्या जातात.

आता हे रुग्णालय कोविड केली तर या रुग्णांनी जायचं कुठे असा सवाल उपस्थित करत आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे सांगून आम्हाला ही कोविड पेशंट दाखवून द्या अशी संतप्त प्रतिक्रिया कॅन्सर पीडित रुग्ण विद्या फडतळे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कॅन्सर सारख्या रुग्णालयाची एम्स हॉस्पिटल हे नॉन कोव्हीड ठेवण्यात आले आहे. तसेच इतर आजारांसाठी एम्स व ममता रुग्णालय सारखी रुग्णालय नॉन कोव्हीड ठेवण्यात आली आहेत. वैद्य रुग्णालयाचा एमओवी पालिकेकडून केलेला नसून रुग्णालय प्रशासनाने स्वतः या रुग्णालयाचे कोविड मध्ये रूपांतरित केलं आहे.

त्यासाठी आमच्या मान्यतेची गरज नाही. रुग्णालयाच्या परिसरातील सोसायटीचा रुग्णालयाकडून होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न होता त्याबाबत रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले.एकीकडे पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत परंतु पालिकेचे त्यावर नियंत्रण नसून कॅन्सर आणि किडनी सारखे अन्य आजारही गंभीर स्वरूपाचे आहेत. अनेक रुग्णालय प्रशासनांकडून केवळ पैसे कमावण्याचा कारभार सुरू आहे.

शासनाकडून मिळणारे पैसे कमविण्यासाठी अनेक रुग्णालय कोविडमध्ये रूपांतर होत असल्याच्या तक्रारी ही अनेक जणांनी केल्या आहेत आणि हे थांबविण्यासाठी पालिका प्रशासन कुठे तरी कमी पडत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भालेराव यांनी केला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies