सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 63 कैद्यांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 3 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश आहे.

सांगली | जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 63 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वी कारागृहात तपासणी करण्यात आली होती. रात्री उशिरा त्याचा अहवाल कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 3 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश आहे. सांगलीतील मध्यवर्ती कारागृह गेल्या कित्येक महिन्यापासून हाऊसफुल्ल आहे. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर कारागृहाजवळ असलेल्या एका शाळेत नव्याने आलेल्या बंद्यांना ठेवण्यात आले आहे.

बऱ्याच दिवसापासून न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने अनेकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कैद्यांसाठी कारागृहातच आयसोलेशन वार्ड तयार करण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies