अमोल कोल्हेंचा वादग्रस्त पुस्तकावरून खणखणीत इशारा

...तर भस्मसात व्हाल! - अमोल कोल्हे

मुंबई । भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुस्तकावरून खणखणीत इशारा दिला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करून पुस्तकावरून प्रतिक्रिया दिली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, की एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. परंतु, ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे, पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल!AM News Developed by Kalavati Technologies