यावर्षी 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. 29 रोजी घटस्थापना सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योगात होईल. यावेळी देवीमाता हत्तीवर स्वार होत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.
नऊ दिवसांच्या नऊ देवी
प्रतिपदा - शैलपुत्री
दि्वतीया - ब्रह्मचारिणी
तृतीया - चंद्रघंटा
चतुर्थी - कुष्मांडा
पंचमी - स्कंदमाता
षष्ठी - कात्यायनी
सप्तमी - कालरात्री
अष्टमी - महागौरी
नवमी - सिद्धिदात्री
प्रतिपदेला (29 सप्टेंबर) ब्रह्म मुहूर्त घटस्थापनेसाठी शुभ मानला जातो. ललिता पंचमी 3 ऑक्टोबर रोजी, महाष्टमी 6 आणि महानवमी 7 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. पुराणात नवदुर्गाच्या रूपात 2 ते 10 वर्षांच्या मुलींच्या पूजेचे वर्णन केले आहे. अष्टमी आणि नवमीला कुलदेवीची तसेच विशेष पूजेचीही परंपरा आहे.
वर्षातून 4 वेळा येते नवरात्र
नवरात्र ही वर्षातून चार महिन्यांत साजरी केली जाते. चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात नवरात्र असते. यापैकी दोन नवरात्र चैत्र आणि अश्विन अधिक महत्त्वाच्या आहेत. उर्वरित दोन्ही नवरात्रींना 'गुप्त नवरात्र' म्हणून ओळखले जाते. शारदीय नवरात्र रविवारी, 29 सप्टेंबरपासून हस्त नक्षत्र, ब्रह्म योग, कन्या राशि चंद्र आणि कन्या राशीमध्ये प्रारंभ होईल. कन्या, बुध हा स्वामी असल्याने तो सर्वांसाठी शुभ असेल.
नवरात्रात दश महाविद्या, भगवती काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्मस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला यांचीही मनोभावे पूजा केली जाते. काही पंचांगांनुसार, देवीमाता यावर्षी हत्तीवर स्वार होऊन येईल आणि घोड्यावरून प्रस्थान करेल.