चामखीळ का येतात? चामखीळ घालवण्याचे 'हे' आहेत वैद्यकीय उपाय

चामखीळ का येतात? चामखीळ घालवण्याचे 'हे' आहेत वैद्यकीय उपाय

एएम न्यूज नेटवर्क । शरीरातील एका विशिष्ट प्रकारच्या व्हायरसमुळे अंगावर चामखीळ येतात. शरिरासाठी त्या धोकादायक नसल्या तरी त्यामुळे शरीराचे सौंदर्य मात्र बिघडते. काही घरगुती उपायाने या चामखिळी घालवता येतात. त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींकर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. तळपायावर वाढलेले चामखीळ पायाला कुरूप झाल्याप्रमाणे भासते, त्यामुळे चालताना वेदना होतात.

लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या. तसेच बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल. लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.AM News Developed by Kalavati Technologies