बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे? आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल, कोणता आहार घ्यावा, कोणते उपाय करावेत वाचा...

स्तनपानाचे दूध वाढवण्यासाठी कसा कराल आहार जिर्‍याचा समावेश ?

बाळाचे स्तनपान सुरू असताना आईचाही आहार सकस हवा, अन्यथा तिला थकवा येणे, डोळ्यापुढे अंधार येतो. श्वास लागतो. बाळाने दूध प्यायल्यानंतर गळून गेल्यासारखे होते. त्यामुळे आईने तिचा आहार पोषक व चौकस राहील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे, अन्यथा या काळात अॅनिमिया होण्याची शक्यता बळावते.

नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे.

बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे? आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल, कोणता आहार घ्यावा, कोणते उपाय करावेत -

आईने पोषक व संतुलित आहार घ्यावा. स्तनपान देणाऱ्या स्त्रीला आहारातून जास्त कॅलरीजची आणि कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वांची खूप गरज असते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या स्त्रीने नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला पाहिजे.


आईचे दूध वाढविण्यासाठी उपाय :

आईचे दूध वाढवण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत.

मांसाहार करीत असल्यास मांस, मासे आहारात समाविष्ट करू शकता.

आहारात नाचणी, बाजरी, गूळ, अळीव, डिंकाचे लाडू, शतावरी, बदाम, खारीक यांचा समावेश असावा. वरील सर्व पदार्थांमुळे स्तनदा मातेमध्ये प्रोलेक्टिन ह्या हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते.

आहाराबरोबरचं स्तनदा मातेने पुरेसे पाणीही प्यायला हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे.

मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या, जेवणात शेवग्याच्या शेंगा आणि डाळिंब, सफरचंद, कलिंगड यासारखी फळे असावीत.

डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या ह्या त्यांच्या सूचनेनुसार नियमित घ्यावीत. तसेच काहीवेळा आपले डॉक्टर दूध वाढवणारी औषधे देऊ शकतात. ती औषधेही डॉक्टरांच्या सूचनेनुसार घ्यावीत.

दूध वाढण्यासाठी बाळाने नीट दूध पिणे हाही एक मोठा उपाय आहे.

स्तनपानाचे दूध वाढवण्यासाठी कसा कराल आहार जिर्‍याचा समावेश ?

एक टीस्पून जिरं पूड आणि साखर एकत्र करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापुर्वी गरम दूधासोबत प्यावे.

भाजलेल्या जिर्‍याची पूड करा आणि त्याचा वापर कढी, आमटी, डाळ तसेच रस्सा भाजीत अवश्य करा.

चाट, ताक, रायतामध्ये हमखास भाजलेली जिरंपूड मिसळल्यास त्याचा स्वादही वाढतो आणि नवमातांना फायदेही होतात.

नवमातांमध्ये दूधाची निर्मिती वाढवण्यासाठी रात्रभर जिर्‍याचे काही दाणे भिजत ठेवा आणि ते पाणी सकाळी उठल्यावर प्या.AM News Developed by Kalavati Technologies