मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर, 'हे' आहेत उपाय

कोणत्या भाज्या टाळाल?, खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये?

मूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले तरी साधारण पाच टक्के लोकांना मूतखड्याचा त्रास कधी ना कधी झाल्याचे लक्षात येईल. यापैकी पन्नास टक्के लोकांना एखाद्या-दुसऱ्या वेळी त्रास झालेला असतो. पण पन्नास टक्के रुग्णांमध्ये हे खडे पुन्हा पुन्हा निर्माण होतात. आपल्या मनात अनेक शंका असतील. उदा. मूतखडा म्हणजे काय? कसा असतो मूतखडा? कशामुळे तयार होतो? मूत्रमार्गात कुठे असतो? त्याचे प्रकार असतात का? तो औषधाने विरघळतो की शस्त्रक्रिया करावीच लागते? खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये?

किडनीस्टोनचा त्रास असणार्‍यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनीस्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनीस्टोनच्या रूग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बीया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेखील किडनीस्टोनचा त्रास वाढू शकतो.

कोणत्या भाज्या टाळाल?

भेंडी, टोमॅटो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास बीया काढून इतर भाग आहारात समाविष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू, डाळिंबचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.

मूतखडा म्हणजे काय..?

आपल्यापैकी अनेकांना मुतखड्याचा त्रास असतो. किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात. बहुतांशवेळा किडनी स्टोन्स हे कॅल्शियम पासून बनलेले आढळतात. तसेच युरीक एसिड आणि ऑक्सॅलेटपासूनही किडनी स्टोन्स बनतात. हे खडे किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीद्वारे मुत्राशयात येत असतात. मुतखड्याचा आकार लहान असल्यास लघवीवाटे सहजतेणे बाहेर पडू शकतो. मात्र अधिक मोठ्या आकाराचा खडा मुत्रवाहीनीमध्ये अडकतो. मुतखडा मूत्रवाहिनीत अडकल्याने मूत्राच्यामार्गात अडथळा निर्माण होतो तेव्हा अधिक वेदना होऊ लागतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.

मूतखडा लक्षणे : अनेकवेळा कोणत्याही लक्षणाशिवाय किडनीतील लहान असणारे खडे आकाराने मोठे बनतात. जेव्हा किडनीतील खडे मुत्राच्या प्रवाहाबरोबर युरेटर मधून मुत्राशयात येत असतात त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.


मुतखडा होण्याची ही आहेत कारणे 


- शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे आणि लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
- ‎कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे.

- ‎लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
 -‎ विहीर किंवा बोरवेलचे पाणी कायम पिल्यामुळे.

- ‎लघवी बराच वेळ मुत्राशयात रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे.
- ‎लघवीतील जिवाणू संक्रमनामुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शनममुळे).
- ‎तसेच अनुवंशिक कारणांमुळेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.


मुतखड्यांचा किडणींवर हा परिणाम होतो

मुतखड्यांमुळे लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी ही मुत्रमार्गातून सरळ खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणीवर ताण येतो व किडणी फुगते.
जर या मुतखड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत तर दीर्घकाळ फुगून राहीलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. त्यामुळे किडनी फेल्युअर किंवा किडणी निकामी होण्याचा धोका असतो.
याशिवाय किडन्यांमध्ये इन्फेक्शन होणे, युरिनरी फिस्टुला निर्माण होणे यासारखा त्रास मुतखड्यांमुळे होऊ शकतो.


मूतखडा होऊ नये म्हणून हे आहेत उपाय

- भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.
- ‎दररोज किमान 2 लिटर लघवी बाहेर टाकली गेली पाहिजे.

- ‎मधुमेह असल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवा.
- ‎उच्चरक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा.

- ‎लघवी कधीही अडवून धरू नये. दोन तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये.
- ‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. 4 ग्रॅम (एक चमचा) पेक्षा अधिक मिठाचा वापर आहारात असू नये.

- ‎वजन आटोक्यात ठेवा.
- ‎शीतपेये, अतितेलकट पदार्थ, आंबट, खारट पदार्थ, पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ, टोमॅटोच्या बिया, वांगी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी खाणे टाळावे. मांसाहार, अंडी प्रमाणातच करावा.

- ‎हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश असावा, शहाळ्याचे पाणी, केळी, मनुका, कुळथाची आमटी आहारात असावी.
- ‎मुतखड्याच्या रुग्णांनी योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते. एकदा मुतखडा झाला असल्यास पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने योग्य आहार आणि काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी व उपचार करून घ्यावेत.AM News Developed by Kalavati Technologies