मुंबई । कोरानाचा भारतात शिरकाव झाल्याने भारत सरकारने लॉकडाऊन ही संकल्पना देशात लागू केली होती. त्यामुळे सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंदे पुर्णत: ठप्प पडले होते. लॉकडाऊनच्या चार टप्प्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी पुन्हा केंद्र तसेच राज्य सरकारने अनलॉकची घोषणा केली होती. मागील 2 महिन्यांपासून अनलॉक 1 आणि 2 ची सुरुवात झाली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुट सुद्धा देण्यात आली होती.
आता पुन्हा 5 ऑगस्टमला अनलॉक 3 ची घोषणा होणार आहे. त्यामध्ये मुख्यत: शाळा सुरु करण्यावर निर्णय घेण्यात येणार होता मात्र आता शाऴा सुरु करण्याच्या निर्णयाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. तसेच व्यायामशाळा व्यतिरिक्त इनडोअर जिमखाने सुद्धा बंदच राहणार आहे. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे