'या' व्यक्तींनी कोवॅक्सीन लस घेऊ नये; कोरोना लसीवर 'भारत बायोटेक'ची महत्वाची सुचना

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, भारत बायोटेकने त्यासंबंधी काही सुचना जारी केल्या आहे

नवी दिल्ली । देशात कोरोना लसीच्या आपातकालीन वापराला मंजुरी मिळाली असून, त्यामुळे अनेकांनी आक्षेप घेत कोरोना लसीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशात सध्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, त्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी आल्या आहे. त्यामुळे लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सीन 200 टक्के प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही वैज्ञानिकांचे सल्ले घेतो त्यानंतरच लस तयार करतो. असे कृष्णा म्हणाले.

कोरोना लसीच्या साईड इफेक्टबद्दल कृष्णा एल्ला म्हणाले की, कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती संदर्भात समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्या व्यक्तींनी कोरोनाची कोवॅक्सीन घेऊ नये. असा सल्ला कृष्णा यांनी दिला आहे. ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ज्यांना ब्लड थीनर्सचा त्रास होतो. त्यांनी आणि ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा अॅलर्जी आहे. अशा व्यक्तीने लस घेऊ नये. तसेच गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या मातांनीही कोरोना लस घेऊ नये.AM News Developed by Kalavati Technologies