लसूण खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरवातीचे काही दिवस लसूण खाणे टाळावे, तसेच...

आपल्या आहारात लसुणचा वापर केला जातो. पण या लसणाचा वापर केवळ चवीसाठी असतो असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. लसुणाची एक पाकळीही शरीरासाठी खुपच फायदेशीर असते. तसेच उपाशापोटी लसुन खाण्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. आयुर्वेदात सांगितले आहे की, लसुण खाल्याने मनुष्य तंदुरुस्त आणि जवान राहतात. लसुन खाल्याने भूक वाढते, मूळव्याध, बध्दकोष्ट आणि कानदुखीच्या उपचारासाठीही फायदेशीर आहे.

उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास 5 हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच त्वचाही नितळ होते.

डायरिया आदिच्या उपचारासाठी लसुन प्रभावकारी असते, लसुण खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यासोबतच आपली ताकतही वाढते. उपाशीपोटी लसुणचे सेवन करत आहात तर कोलेस्टेरॉलला नियंत्रित होण्यास मदत होते.

लसुण तणाव कमी करण्यासाठी देखील सहाय्यक असते, लसुण खाल्ल्याने हायपरटेंशनच्या लक्षणांपासुन आराम मिळतो. हे फक्त रक्त प्रवाह नियमित ठेवत नाही तर हृदयासंबंधीत समस्या दूर करते,
लसुण पचनक्रियेला उत्तेजित करते आणि भूक वाढवते.

लसुणमध्ये पोटातील विषयुक्त पदार्थ दूर करण्याची ताकद असते. यामुळे पोटातील बॅक्टेरीयाही दूर होतात. खासकरुन जेव्हा तुम्ही उपाशीपोटी याचे सेवन करतात. डायबिटीज, ट्युफ्स, डिप्रेशन आणि काही प्रकारच्या कँसरपासुन वाचवण्यात लसुण मदत करते. लसुण दमा, निमोनिया, सर्दी, कफ आदी आजारांचा उपचार करते.

लसूण एक नसर्गिक पेस्टीसाईड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून कीटकनाशक तयार केले जाऊ शकते. लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गुणकारी आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो.

ज्यांना पोटाचे विकार, अतिसार, ऍलर्जी, लो-ब्लडप्रेशर यासारखा त्रास आहे त्यांनी लसूण खाऊ नये. तसेच लसूण खाण्यामुळे रक्त पातळ होत असते त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरवातीचे काही दिवस लसूण खाणे टाळावे.

गरोदरपणात आहारातून लसूण खाऊ शकता त्यामुळे गरोदरपणात होणारा मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या नियंत्रित राहतील. मात्र प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर काही आठवडे लसूण खाणे टाळावे. कारण रक्त पातळ होऊन प्रसूतीमध्ये अतिरक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

लसूण खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी लसूण खाताना पुरेशी काळजी घ्यावी. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार नियोजन करावे. शक्यतो मधुमेह रुग्णांनी कच्ची लसूण खाऊ नये. आहारातुन काही प्रमाणात लसूण खाऊ शकता.AM News Developed by Kalavati Technologies