गुळ खाण्याचे 'हे' आहेत फायदे

गुळ खाण्याचे 'हे' आहेत फायदे

एएम न्यूज नेटवर्क ।  गुळ आणि शेंगदाणे यांचे नियमित सेवन केल्याने अनेक फायदे होतात. गुळाचे खूप सारे उपयोग आहेत. गुळाचा चहा सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतो. गुळ आणि दुध यांचे मिश्रण अनेक रोगांवर इलाज आहे. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरत. एरव्ही मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसून येत नाही. पण गुळाचा आहारात समावेश असायला हवाच कारण फक्त गोडवा वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीदेखील गूळ फायदेशीर आहे. गुळामधील लोह आणि दुधातील कॅल्शिअममुळे स्नायू आणि सांध्यांचं दुखणे कमी होण्यास मदत होते. दुधामध्ये व्हिटॅमिन 'अ', 'ब' व 'ड' व्यतिरिक्त कॅल्शिअम, प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिडदेखील असते. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असते.


– गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.
– शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
– शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो
– थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो.
– मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.


– पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
– रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
– जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.
– घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खाल्ल्याने आराम मिळतो.
– पण गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो, म्हणून ज्यांना त्वचेचे रोग असेल त्यांनी गूळ खाऊ नये.

दूध व गुळाच्या सेवनामुळे सांध्यांचे दुखणेदेखील कमी होण्यास मदत होते. कारण दुधात व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम आणि गुळातील लोहामुळे सांधे मजबूत होतात. तुम्ही गुळाचा तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता. यामुळे देखील शरीरास आरोग्यास फायदा मिळेल.

शेंगदाण्यामध्ये काजूचे गुणधर्म आढळतात, म्हणूनच शेंगदाण्याला गरिबांचे काजू म्हटले जाते. शरीरातील धातूंची झालेली झीज भरून काढण्याचे काम एक मूठभर शेंगदाणे करतात. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटिन्स,कार्बोहायड्रेट असतात. तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे याचे सेवन दररोज केल्याने आठवडा भरात चांगल्या प्रमाणात रक्त वाढ झाल्याचे जाणवते. त्याचप्रमाने अशक्तपणा , शरीरातील मरगळ दूर करण्याचे कामही करतात.

बाळाच्या योग्य वाढीसाठी गरोदर महिलांनी रोजच्या आहारात याचे सेवन केल्याने फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे गुळ आणि शेंगदाणे हे पचनशक्ती वाढवण्याचे कामही करते .त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. अशक्त मुले, स्त्री पुरूषांनी आठवडाभर शेंगदाणे आणि गुळाचा आहारात समावेश केल्यास वजन वाढण्यास नक्कीच मदत होते.

अधिक प्रमाणात गोड पदार्थाचं सेवन केल्यास केवळ शारीरिक वजन वाढण्याचाच धोका नसतो तर अनेक आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळतं. यामुळेच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ गोड पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात. मात्र, गुळ एक असा गोड पदार्थ आहे जो तुमच्या आरोग्यासाठी प्रचंड पोषक आहे. रोज रात्री दुधासोबत गुळाच्या एका छोट्या तुकड्याचं सेवन केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. गुळ व दुधातील सत्त्व शरीरास निरोगी राहण्यास मदत करतात.AM News Developed by Kalavati Technologies