काजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे, ‘औषध’ म्हणून काजू खायलाचं हवे ?

काजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे, ‘औषध’ म्हणून काजू खायलाच हवे ?

एएम न्यूज नेटवर्क । काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर चवीस गोड असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात. सुका मेवा म्हणलं की बदाम, काजु, मनुके, अक्रोड हे लगेच डोळ्यासमोर येतात. बदाम कुशाग्र बुद्धीसाठी आणि स्मरणशक्तीसाठी खातात. असे प्रत्येकाचे काही ना काही फायदे आहेतच. पण चवीला आवडणारा सुका मेवा म्हणजे काजु. योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास वर्षानुवर्षे टिकणारा. घरात शिऱ्यापासून बासुंदीपर्यंत जेवणाला चव आणणारा काजु लहानांमध्ये विशेष प्रिय आहे.

चवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे. अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्‍या होतात. जनावरांच्या पायांना विशेषत गायी, म्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो. मण्यार नावाच्या सर्पविषावर उपयुक्त असा एक काजूचा पाठ ग्रंथामधून सांगितलेला आहे. त्वचेवर एखादी गाठ तयार होऊन सूज चढते, लाली येते आणि खूप त्रास होतो. अशा वेळी काजूचा कच्चा गर त्या गाठीवर गरम करून बांधावा त्यामुळे गाठ फुटून निचरा होतो आणि जखम लवकर बरी होते. पोट फुगून पोटात दुखत असेल तर काजूचं पिकलेलं फळ घेऊन देठाकडील बाजू कापावी. त्यात जिरेपूड आणि मीठ घालून ते फळ खायला द्यावं. हा उपाय सलग चार-पाच दिवस करावा. यामुळे भूक वाढून पचन सुधारतं आणि तोंडाला चव येते.खारवलेला किंवा तिखट काजू खाण्यास रुचकर असतात. काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.

काजूगरात असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-E आणि B6 यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच HDL प्रकारच्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि रक्तदाबही नियंत्रित ठेवते. त्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षघात यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास, रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.

काजूमध्ये proanthocyanidineहे अँटी-ऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते. तसेच काजूगरात तांबे मुबलक असल्याने कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.


काजूगर खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास इतर सुक्यामेव्याबरोबर काजूगर खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

दररोज काजूगर खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.

काजूच्या नियमित खाण्यामुळे तारूण्य टिकते व वृद्धत्व दूर राहते. केस व त्वचा निरोगी राहते. त्वचेचा तुकतुकीतपणा टिकून राहतो.

काजूत मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. नियमित काजू खाण्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.

काजुमध्ये असणारे फॅट शरीरासाठी धोकादायक नसतात.

काजू अतिप्रमाणात खाल्यास अपचन होऊ शकते. काजूगर खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जी आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.


 18 काजुगरातील पोषकतत्वे :

फायबर – 1 ग्रॅम
व्हिटॅमिन E – 0.3 मिलीग्राम
व्हिटॅमिन K – 9 .5 मिलीग्राम
व्हिटॅमिन B6 – 0.1 मिग्रॅ

ऊर्जा – 157 कॅलरीज
कर्बोदके – 9 .2 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 5.1 ग्रॅम
फॅट -12.4 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0%
फॉलिक ऍसिड – 7 ug


- कॅल्शियम – 10.4 मिलीग्राम
- सोडियम – 3.4 मिलीग्राम
- पोटॅशियम – 187 मिग्रॅ
- मॅग्नेशियम – 83 मिलीग्राम

समुद्रतटांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या काजुचं फळ दिसायला अगदी पेरूसारखं दिसतं. आणि त्याखाली त्याला आलेलं कोंब म्हणजे आपण खातो ते काजु. भारतात आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि ओडिसा ह्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काजुचं उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रातही कोकणात काजुचं उत्पादन घेतलं जातं. रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग ह्या गावांमध्ये काजू विकले जातात. डॉक्टर लहानांपासून मोठ्यांना काजू खाण्याचे सांगतात. याचा अर्थ काय तर काजू आरोग्यवर्धक आहे. पण फक्त एवढंच जाणून घेणं पुरेसं आहे का? काजूचं सेवन हृदयापासून केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.AM News Developed by Kalavati Technologies