गरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात

मासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.

एएम न्यूज नेटवर्क । बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करत असतात. पण या सवयीमुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अॅसिडीटी, पिंपल्स अशा तक्रारी सुरु होतात. असे म्हटले जाते की त्वचा, केस आणि एकंदर शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी पिण्याची सवयही तुमच्या शरीरातील अनेक विकार मुळापासून दुर करू शकते.

सकाळी उठून नियमितपणे एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पाचन शक्ती चांगली राहते. तसेच गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये साठत असलेले घातक पदार्थ गरम पाण्याच्या सेवनामुळे बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. योगशास्त्राच्या नियमानुसार तीन महिने गरम पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते. या करिता इतर कोणतेही विशेष पथ्य पाळण्याची गरज नाही.

काही लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. अशा वेळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. पुष्कळ महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये डोकेदुखी सतावते. त्यावेळी नियमित गरम पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. तसेच या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी ही गरम पायाच्या सेवनामुळे कमी होते.


गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे


- सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते, शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.

- गरम पाणी पिल्याने पोटातील गॅसेस कमी होतात, अॅसिडीटीचा त्रास, डोकेदुखी व पित्ताच्या तक्रारी कमी होतात.

- गरम पाणी पिल्यामुळे त्वचेचे आरोग्यसुद्धा चांगले राहून, त्वचेवर पिंपल्स येणे कमी होते तसेच केसांच्यावाढीसाठीही गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

- मासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.

- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

- दिवसातून वरचेवर गरम पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यांना पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांनी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ग्लासभर गरम पाणी प्यावे.

-तसेच दररोज सकाळी हळद घालून गरम पाणी पिणेही लाभदायक असते. यामुळेही पचनशक्ती चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे-

- मधुमेही रुग्णांनी व इतरांनीही दररोज सकाळी हळद आणि गरम पाणी पिणे लाभदायी आहे.AM News Developed by Kalavati Technologies