राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; 'या' आहेत डॉक्टरांच्या मागण्या

अत्यावश्यक सेवा देण्यासाठीदेखील मार्ड ने दिला नकार

राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णसेवेवर याचा परिणाम जाणवत आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. त्यामुळे तेथे रोग पसरु शकतात, अशा अवस्थेत डॉक्टरांनी संप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. थकलेले विद्यावेतन मिळावे तसेच, इतरही विविध मागण्या मान्य व्हाव्यात अशी संपकरी डॉक्टरांची मागणी आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सरकारी व महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. या डॉक्टरांचा संप आजपासून सुरु झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा देण्यासाठीदेखील मार्ड ने नकार दिला आहे.

दरम्यान, हा संप बेकायदा आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात साथीच्या आजारात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे रोगराई पसरु शकते, अशावेळी हा संप करणे अयोग्य आहे, असेही बोलले जात आहे.

या आहेत डॉक्टरांच्या मागण्या

सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेवर मिळावे.
सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे गेल्या चार महिन्यांतील थकीत विद्यावेतन मिळावे.
गेल्या दीड वर्षांपासून मार्डच्या डॉक्टरांनी विद्या वेतनासाठी केलेले आंदोलन विचारात घ्यावे.
विद्यावेतनात वाढ, वेळेवर विद्यावेतन, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा इतर मागण्याही संपकरी डॉक्टर्सनी केल्या आहेत.

मागील ऑगस्टपासून विद्यावेतनातील वाढ रखडली आहे. सध्या निवासी डॉक्‍टरांना दरमहा 53 हजार रुपये विद्यावतेन मिळते. त्यात जानेवारीपासून पाच हजार रुपयांची वाढ करण्याचे तोंडी आश्‍वासन हवेतच विरून गेले आहे, अशी टीका त्यांनी केली. कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्‍टरांच्या क्षयरोग व प्रसूती रजेचा प्रश्‍न प्रलंबित आहे.AM News Developed by Kalavati Technologies