कोरोनानंतर चीनमध्ये फोफावतोय नवा आजार; आतापर्यंत 3245 जण पॉझिटिव्ह, 21 हजारांहून अधिक चाचण्या

कोरोनानंतर चीनमध्ये ब्रूसेलोसिस या नवीन आजाराने हाहाकार माजवला आहे

वुहान । जगभरात कोरोनाचा कहर कायम असतांना; चीनमध्ये आता आणखी एका आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. गांसू प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अॅण्ड प्रायव्हेशनने या आजाराचं नाव 'ब्रूसेलोसिस' असं सांगितलं आहे. 'ब्रूसेलोसिस' या आजाराने सुमारे 3 हजार 245 लोकांना ग्रासलं आहे. उत्तर-पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोऊत हा नवीन आजार फोफावत आहे. लान्झोऊ वेटरीनरी रिसर्च इंस्टिट्यूटने डिसेंबर 2019 मध्येच यासबंधी सुचना चीन सरकारला दिली होती.

चीनच्या गांसू प्रांतात सुमारे 21 हजार 847 जणांची तपासणी करण्यात आली. ज्यामधून 4 हजार 646 जणांमध्ये ब्रूसेलोसिसची सौम्य लक्षणे आढळून आली. तर 3 हजार 245 जणांचा अहवाल हा ब्रूसेलोसिस पॉझिटिव्ह आला आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रूसेलोसिस या रोगराईचा प्रादुर्भाव वाढवू नये यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. तसेच कोणाला ब्रूसेलोसिसचे लक्षणं आढळून आले तर त्यांच्यावर रुग्णालयात मोफत उपचार केल्या जाणार आहे. दरम्यान, चीनमध्ये ब्रूसेलोसिस या आजाराविषयी जनजागृतीसाठी ऑनलाईन जाहिराती द्वारे जनजागृती केली जात आहे. जे लोकं आजारी आहेत त्यांची महिन्याभरात अनेकदा तपासणी केली जात आहे.

ब्रूसेलोसिस हा आजार जीवाणूपासून तयार होतो. 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्ट 2019 पर्यंत झोन्गमू लॉन्झोऊ बायोलॉजिकल फार्मास्यूटिकल कंपनीने ब्रूसेला लस तयार करण्यासाठी एक्सपायर्ड डिसइंफेक्टेंटचा वापर केला होता. या लसीचा वापर जनावरांवर उपचार करण्यासाठी होत असतो. मात्र फर्मेंटेशन टाकीत ठेवलेले जीवाणू गॅसवाटे बाहेर पडल्याने ब्रूसेलोसिस हा आजार चीनमध्ये पसरला आहे. आतापर्यंत या आजाराने 3245 जणांना ग्रासलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies