कोरोनारुग्ण सैराट! एकीकडे कोरोनावर मात तर दुसरीकडे झिंगाट; कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांचा झिंगाट डान्स

औरंगाबादेतील वाळूज येथील बजाज विहार कोरोना सेंटरवर डिस्चार्ज झालेल्या 44 जणांचा झिंगाट डान्स

औरंगाबाद । कोरोनाने देशासह राज्याला ही मोठ्या प्रमाणात घेरले आहे. वाढती रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. अगदी कोरोनाचा नाव ही घेण्यास नागरिक घाबरत आहे. औरंगाबादची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत असतांना जिल्ह्याने 12 हजारी ओलांडली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुज येथे एक वेगळा प्रकार घडला आहे.

बजाजनगर येथील बजाज विहार कोरोना सेंटरमध्ये झिंगाट पाहायला मिळाला. सैराट चित्रपटामधील झिंगाट गाणं लागताच डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना झिंगाटचा मोह आवरला नाही. एकीकडे कोरोनावर मात आणि दुसरीकडे झिंगाटमुळे डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांनी झिंगाटचा चांगलाच आनंद लुटला. विशेष म्हणजे यामध्ये वयाचे कोणतेही बंधन नव्हते. अगदी तरूणांपासून जेष्ठांपर्यत सर्वच जण झिंगाटचा आनंद घेत होते.

येथील कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत 286 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आणि आज पुन्हा 44 रूग्णांना सुद्धा डिस्चार्ज देण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies