नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 18 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 7 लाखांच्या पार गेला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्यामाहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 18 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 163 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 7 लाख 20 हजार 48 एवढा झाला आहे.
सध्या देशातील विविध भागात 1 लाख 71 हजार 686 रुग्णांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 54 हजार 10 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 03 लाख 94 हजार 352 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.

India reports 18,855 new #COVID19 cases, 20,746 discharges and 163 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) January 29, 2021
Total cases: 1,07,20,048
Active cases: 1,71,686
Total discharges: 1,03,94,352
Death toll: 1,54,010
Total vaccinated: 29,28,053 pic.twitter.com/YNEVuzCN6l