दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला; गेल्या 24 तासात 12,584 जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे

नवी दिल्ली । देशात आजपासून 4 दिवसानंतर कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. देशात सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला असून, कोरोना रुग्ण सक्रिय होण्याच्या प्रमाणात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासात 12,584 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 167 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 12 हजार 584 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 1 कोटी 4 लाख 79 हजार 179 एवढा झाला आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 51 हजार 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 11 हजार 294 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या देशातील विविध भागात 2 लाख 16 हजार 558 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, देशात स्वदेशी कोरोना लसीला आपातकालीन मंजुरी मिळाली असून, पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधू आज कोव्हिशिल्ड लसीचे 65 लाख डोस देशात पाठवण्यात आले आहे. पुणे विमानतळावरून दिल्लासाठी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला विमान आज सकाळी 8 वाजता रवाना करण्यात आले. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे. पहिल्या टप्प्यात , या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्स यांच्यासाठी होणार आहे.

सीरमला सुरूवातीला 2 कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65 लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड ही लस 2 ते 8 अंश तापमानात ठेवणे आवश्यक असून, कंपनीने त्यासाठी कोल्ड स्टोरेज कंटेनरची व्यवस्था केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies