पहिला बळी! कोरोना संशयिताचा कर्नाटकात मृत्यू, काळजी घेण्याचे सरकारचे आवाहन

हा मृत्यू कोरोनामुळेच झाला असे ठामपणे कर्नाटक प्रशासनाने सांगितले नसले तरी संशय मात्र व्यक्त केला आहे.

एएम न्यूज नेटवर्क । भारतात कोरोना संशयित 76 वर्षीय रुग्णाचा कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. मृत व्यक्तीचे रिपोर्ट्स अद्याप आले नसल्याची माहिती कर्नाटक आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातही या आजाराचे अद्याप 5 रुग्ण आढळले असून प्रशासनाने सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मृत वृद्धाचे नमुने अद्याप प्रयोगशाळेतच आहेत, यामुळे हा मृत्यू कोरोनामुळेच झाला असे ठामपणे कर्नाटक प्रशासनाने सांगितले नसले तरी संशय मात्र व्यक्त केला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना आजाराबाबत जनजागृती केली जात असून मोबाइल कॉलरट्यूनमध्येही जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

देशात कारोना व्हायरसची अद्याप 62 प्रकरणे समोर आली असून जगभरात ही संख्या 4 हजारांच्या घरात आहे. भारताने जर्मनी, फ्रान्स, इटली व स्पेनच्या नागरिकांच्या भारत प्रवेशावर तात्पुरती बंदीही घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची पाच प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीची पावले उचलत या आजाराविषयी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies