कोरोना लसीबाबत आज होणार मोठी घोषणा, DCGI ने बोलावली पत्रकार परिषद

DCGI ने आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, त्यात कोरोना लसीबाबत शेवटची मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

नवी दिल्ली । नववर्षाची सुरूवात एका आनंदाच्या बातमीने झाली आहे. नववर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी कोरोना लसीबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने स्वदेशी कोरोना लसीला आपातकालीन परिस्थितीत वापरण्याची मंजूरी दिली आहे. याचदरम्यान नववर्षाचा आजचा तीसरा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण आता कोरोना लसीची प्रतिक्षा कायमची संपणार आहे.

कोरोना लसीच्या शेवटच्या मंजुरीसाठी सगळ्या नजरा आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे लागल्या आहे. आज DCGI सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन कोरोना लसीबाबत मोठा निर्णय घेणार आहे. देशात आतापर्यंत 'कोविशील्ड' आणि 'कोवॅक्सीन' या दोन लसी वापरण्याला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आजच्या DCGI च्या पत्रकार परिषदेत कोणती घोषणा होते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies