सावधान! मानवालाही होऊ शकतो 'बर्ड फ्लू' - केंद्रीय पशुपालन राज्य मंत्री संजीव बालियान

बर्ड फ्लूचा संसंर्ग मनुष्याला सुद्धा होऊ शकतो असे प्रतिपादन संजीव बालियान यांनी केले आहे

नवी दिल्ली । देशात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लसीचा सुखद धक्का मिळाल्यानंतर, आता पुन्हा देशासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक राज्यात राज्य आपत्ती जाहीर करण्यात आली आहे. देशात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, झारखंड आणि केरळमध्येही बर्ड फ्लूनं थैमान माजवले आहे.

त्यावर आता केंद्रीय पशुपालन राज्य मंत्री संजीव बालियान यांनी सांगितले की, बर्ड फ्लूचा संसर्ग मानवाला सुद्धा होऊ शकतो. देशात आतापर्यंत असा प्रकार घडलेला नसून, सावधान राहण्याचा ईशारा केंद्रीय मंत्र्यांनी दिला आहे. या आजारावर कोणताही उपाय नसून राज्य सरकारने पक्ष्यांबद्दल सावध राहायला हवे. देशात आतापर्यंत 5 राज्यात A1 इन्फ्लूएंजाचे केसेस आढळले असून, हरियाणातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये ही बर्ड फ्लू आढळला आहे. असे बालियान म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies