औरंगाबाद । घाटी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण दाखल

रुग्णाची तपासणी सुरू

औरंगाबाद । औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला असून घाटी प्रशासनाकडून यामुळे संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. या रुग्णाची तपासणी सुरू असून रुग्णावर मनुष्य हा विपश्यना करून परतला आहे. त्याला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याने त्याला संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. याबाबत रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅब ला पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुण्यापाठोपाठ मुंबईतही दोनजणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे. दुबईहून आलेल्या दाम्पत्यासोबत विमानात होते हे दोघे सहप्रवासी आहेत. पाचचा आकडा वाढून आता सातवर गेला आहे. अकरा संशयीत कोरोनाच्या रुग्णावर नायडूत उपचार सुरु आहेत. राज्यभरात आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या 349 प्रवाशांपैकी 312 प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. 18 जण पुण्यात तर 15 प्रवाशी मुंबईत सध्या उपचार घेत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies