कोरोनानंतर देशात आता 'बर्ड फ्लूचा' कहर, हरियाणात 1 लाख कोंबड्यांचा मृत्यू

देशात बर्ड फ्लूने थैमान घातले असून, हरियाणात 1 लाख कोंबड्याचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली । देशात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लसीचा सुखद धक्का मिळाल्यानंतर, आता पुन्हा देशासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक राज्यात राज्य आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.

देशात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, झारखंड आणि केरळमध्येही बर्ड फ्लूनं थैमान माजवले आहे. मध्यप्रदेशात 23 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत तब्बल 376 कावळ्यांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक 142 कावळे इंदौरमध्ये मृत पावले. याशिवाय मंदसौरमध्ये 100, आगरा-मालवा 112, खरगोन 13 आणि सीहोर येथे 9 कावळ्यांचा मृत्यू झाला होता.

त्यांचे नमुने भोपाळमध्ये तपासणीसाठी पाठवला असता त्यात बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पशू विभागाने निर्देश दिले आहे की, पोल्ट्रीमधील पक्षांमध्ये जरी लक्षणं नसले तरी, पोल्ट्री उत्पादन बाजारात, फार्म, जलाशय आणि स्थलांतरित पक्षांवर विशेष लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे. हरियाणाच्या बरवाला परिसरात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे या भागात एव्हीयन फ्लूची भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सुमारे 1 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies