Corona In India : देशात गेल्या 24 तासात 8,635 जणांना कोरोनाची बाधा, तर 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 8635 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली । देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, गेल्या 24 तासात 8,635 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 1 कोटी 7 लाख 66 हजार 245 एवढा झाला आहे. तर गेल्या 24 तासात 94 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 1 लाख 54 हजार 486 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 1 लाख 63 हजार 353 जणांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 48 हजार 406 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशातील कोरोना रिकव्हरी दर हा 97.05 टक्के इतका असून, मृत्यूदर हा 1.43 टक्के इतका आहे.AM News Developed by Kalavati Technologies