21 अत्यावश्यक औषधे महागणार! एनपीपीएचा निर्णय

'या' अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएनं हा निर्णय घेतला

मुंबई । सुमारे 21 अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमतीत 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणानं घेतलाय. यात बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे. औषधांच्या नियंत्रित केलेल्या किमती वाढविण्याचं धोरण पहिल्यांदाच ‘एनपीपीए’नं स्वीकारलंय. अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे आणि यासाठी ‘एनपीपीए’कडून औषधाच्या किंमतीवर नियंत्रण आणलं जातं. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किंमतीत वाढ झाल्यानं औषधांच्या कमाल किंमती वाढवण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएनं हा निर्णय घेतला आहे.AM News Developed by Kalavati Technologies