...त्यामुळे पोटात जंत होतात, पोटातील जंतावर मात करण्यासाठी 'हे' आहेत घरगुती उपाय

पोटात जंत झाले की फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात

एएम न्यूज नेटवर्क ।  टोमॅटो हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ आहे. भाजीपासून सूप आणि सलाडमध्येही टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर काही आरोग्यदायी फायद्यांसाठीही आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर आहे. पोटात जंत होण्याचा त्रास लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळतो. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी टोमॅटोच्या रसामध्ये काळामिरीची पूड मिसळून पिणं फायदेशीर ठरते. या घरगुती उपायाने पोटातील जंताचा त्रास कमी होतो. लहान मुलांच्या शारिरीक वाढीसाठीदेखील टोमॅटो फायदेशीर ठरतो. टोमॅटोच्या नियमित सेवनाने डोळ्यांचे, मूत्राशी संबंधित काही समस्या, बद्धकोष्ठता आणि मधूमेहाच्या रूग्णांना फायदा होतो.

पोटात जंत होण्याची ही आहेत लक्षणे - पोटात दुखणे, जुलाब, उलटी व मळमळ होणे, पोट साफ न होणे, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, वजन कमी होणे, अंगावर आणि चेहऱ्यावर पुरळ, पांढरे चट्टे येणे, संपूर्ण शरीराची खाज होणे, गुदाभोवती खाज येणे, शौचातून रक्त पडणे व शौचातून जंत पडणे. ही कृमी किंवा जंत पोटात असल्याची लक्षणे आहेत.

पोटात जंत होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय :-  वैयक्तिक स्वच्छता राखावी, नखे आठवड्यातून एकदा कमी करावीत, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, दूषित अन्न, उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, पालेभाज्या, फळे व कंदमुळे स्वच्छ धुऊनचं खावीत, दूषित पाणी पिऊ नये, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे अशा साध्यासोप्या गोष्टीतून जंताचा त्रास होण्यापासून दूर राहता येते.

लहान मुलांचा कफ – लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते. यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर २० ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे तीन चमचे तेल त्यात ४– ५ थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो.

रक्त वाढीसाठी – आजकाल बर्‍याच जणांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमियाचा त्रास होत असतो.यावर खजूराच्या 4- 5 बिया 1 महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

गॅस धरणे - बर्‍याच वेळा वेळी अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृध्द व्यक्तीनांही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच 1 भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवडयासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते.

पोटातील जंतावर मात करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

दिवासातून दोन वेळा अर्धा चमचा ओवा खाल्यामुळे पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार विडंग किंवा वावडिंग हे उत्तम कृमिनाशक आहे. कृमीचा त्रास असल्यास विडंग असणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. याशिवाय पाव चमचा ओवा आणि चमचा वावडिंग एकत्र करून चावून खाल्याने जंत कमी होण्यास मदत होते.

कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्यात मध घालून उपाशीपोटी खावे. कडुनिंब अँटीबायोटिक गुणांचे असून यामुळे पोटातील कृमी कमी होण्यास मदत होते.

कृमीचा त्रास असल्यास आहारात लसूणचा वापर करावा. सैंधव मीठ घालून लसूणची चटणी तयार करून खावी. यामुळेही कृमी कमी होतात.

रोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वावडिंग एकत्रित करून 2 महिने घेतल्यास पोटातील जंत कमी होतील.

वारंवार जंत होण्याची समस्या असल्यास जेवणानंतर एक-दोन लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चावून खावा.

आहारात गाजर, कच्ची पपई, डाळिंब, लसूण, भोपळ्याच्या बिया, कारल्याचा रस, हळद यांचा समावेश करावा यामुळे कृमी कमी होण्यास मदत होते.

फुफ्फुसाच्या आजाराची शक्‍यता -  पोटात जंत झाले की फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात, हे आता लक्षात आले आहे. हा त्रास छोट्यांबरोबर मोठ्यांनाही होऊ शकतो. काही प्रकारच्या कृमी आतड्यातून मलाद्वारे खाली न जाता, उलट्या बाजूने प्रवास करीत फुफ्फुसांत जातात. तिथे त्या राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात. अशा वेळी श्वसनाच्या आजारावर औषधोपचार करावे लागतातच, पण या कुटुंबातील सर्वांनीच सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध घ्यायला हवे.AM News Developed by Kalavati Technologies