औरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

चार जिल्ह्यांत लसीकरण
लसीकरण मोहिमेत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बालकांना लसीकरण केले जात आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक बालकांचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. लाळे यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies