वाशिममध्ये गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक

पडळकर यांच्या फोटोला भ्रष्ट लोकांनी हात लावल्याने त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे असं म्हणत केला अभिषेक

वाशिम |  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस वाशिम शहरात दुधाचा अभिषेक करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त विधान केलं होतं. 

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या या वक्तव्याचा निषेध करत, त्यांचे ठिकठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले होते, तसेच त्यांच्या फोटोला चप्पलांचा हार सुद्धा घालण्यात आला होता. राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांचा तीव्र निषेध केला होता.

मात्र गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला भ्रष्ट लोकांनी हात लावल्याने त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे असं म्हणत आज वाशिम मधील पाटणी चौक येथे आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाने अभिषेक केला यावेळी भाजपचे नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.AM News Developed by Kalavati Technologies